Share

अक्षय बोऱ्हाडे पुन्हा वादात; गॅस वितरकाला खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटक

Published On: 

जुन्नर : शिरोली बुद्रुक येथील अक्षय मोहन बोऱ्हाडे हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. समाजसेवा करणारा म्हणून सोशल मीडियामध्ये तरुणांच्यात क्रेझ असलेल्या अक्षय बोऱ्हाडेने गॅस वितरकाकडे खण्डणीची मागणी करत जीवे मारल्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी मंगळवारी रात्री उशिरा जुन्नर पोलिसांनी त्याला अटक केली.

जुन्नर येथील एच पी गॅस वितरक रुपेश प्राणलाल शहा याचे नागरी वस्तीत गॅस सिलिंडरचे गोदाम असल्याप्रकरणी अक्षय बोऱ्हाडे याने माहिती अधिकारातून जुन्नर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागातून माहिती मागवली होती. याप्रकरणी त्याने शहा यांना फोनकरून पैशाची मागणी केली. ‘माझी माणसे पाठवली आहेत, त्यांच्याकडे पैसे दे. तसेच माझ्या संस्थेला येणारा खर्च उचल. नाहीतर मी फेसबुक लाईव्ह करेन आणि मग तुझा व्यवसाय कसा चालतो हेच बघतो,’ अशी धमकी बोऱ्हाडे याने दिली.

नंतर रुपेश शहा यांनी प्रतिसाद न दिल्याने त्याने पुन्हा जून २०२१ मध्ये फोन करून पैसे दे नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली. खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी अक्षय बोऱ्हाडे यास अटक करून आज (बुधवार) रोजी प्रथम वर्ग जुन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक युवराज पाटील यांनी दिली आहे. दरम्यान, याआधी देखील अक्षय बोऱ्हाडे हा अनेकदा चर्चेत आला आहे. फेसबुक लाईव्हद्वारे आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जुन्नर येथील शिवसेनेच्या नगरसेवकांनी व पदाधिकाऱ्यांनी कारवाई करणेबाबत निवेदन देखील दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!