नवी दिल्ली : गेल्या वर्षभरापासून जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूची अनेक देशांमध्ये दुसरीला देखील आली आहे. त्याचबरोबर भारतात देखील राजधानी दिल्लीत करोना रुग्णांची संख्या झपाटयाने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासह हैद्राबाद व अहमदाबादमधील लस संशोधन करणाऱ्या कंपन्यांना भेट दिली होती.
यानंतर, नेमकी लस कधी येणार? सर्वसामन्यांना परवडणार का? प्राधान्यक्रम कसा असेल? कितपत उपायकारक असेल? दुष्परिणाम असतील का? हे व असे कित्येक प्रश्न निर्माण झाले आहेत. अशातच आता, कोरोना लसीच्या लॉंचिंगबाबत महत्वाची बाब समोर येत आहे. ब्रिटनमध्ये सोमवारपासून लसीकरणाला सुरुवात झाल्यांनतर अवघ्या जगाचं लक्ष्य असलेल्या भारतात देखील लवकरच लसीकरणास सुरुवात होणार आहे.
मोदी सरकारने लसीकरणाला परवानगी देण्यासाठी हालचाली सुरु केली असून तारीख देखील ठरवण्यात आल्याच्या चर्चा सद्या आहेत. त्यानुसार, पुढच्या थोड्याच दिवसांत, 2021 च्या आधीच भारतात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते. CNBC ने दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह वृत्तानुसार, पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आणि फायझर या कंपन्यांनी लशीच्या वापराला परवानगी देण्यासंदर्भात DCGI कडे अर्ज केला आहे. गरजवंतांना तात्काळ लस देण्याची परवानगी मागणारा हा अर्ज भारतीय औषध नियामक मंडळाकडे म्हणजे DCGI कडे आला असून त्यावर तातडीने विचारविनिमय सुरू आहे. या लशीच्या इमर्जन्सी वापरासाठी परवानगी देण्याचा निर्णय दोन आठवड्यात होऊ शकतो, अशी सूत्रांची माहिती आहे.
एबीपीने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः लशीची घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यासाठी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन म्हणजेच 25 डिसेंबरचा मुहूर्त साधला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. 22 ते 26 डिसेंबरदरम्यान या दोन्ही लशींना परवानगी मिळून देशात लसीकरणाला सुरुवात होऊ शकते.
महत्वाच्या बातम्या
- महाविकास आघाडीने केंद्र सरकारच्या शेतकरी कायद्याला पाठींबा द्यायला हवा होता – रामदास आठवले
- नर्सेसच्या रिक्त जागा तातडीने भरल्या जातील, राजेश टोपेंचे आश्वासन
- टाटा मोटर्सच्या गाड्यांवर मिळणार चक्क ‘एवढी’ सूट, हॅरिअर, नेक्सॉनवरही जबरदस्त ऑफर !
- ‘भारत बंद’ला प्रतिसाद मिळणार नाही; रामदास आठवलेंचा दावा
- शेतकरी आंदोलन : उद्याच्या भारत बंद दरम्यान काय सुरू, काय राहणार बंद ?


