नवी दिल्लीः कोरोनाच्या काळात मंदावलेले वाहन उद्योग आणि वाहन खरेदी यानां अनलॉक नंतर गती मिळाली आहे. तर आता वर्षाच्या शेवटी कार खरेदीदारांना मोठी वाहन खरेदीवर भरघोस सूट मिळवण्याची संधी मिळाली आहे. इअर एंड म्हणजेच डिसेंबर 2020 मध्ये टाटा मोटर्सनं गाड्यांवर जबरदस्त सूट देण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या यादीत अनेक गाड्यांचा समावेश आहे. 15 हजार रुपयांपासून 65 हजार रुपयांपर्यंत या गाड्यांवर सूट मिळत आहे. तसेच त्यात एक्सचेंज बोनस आणि दुसऱ्या ऑफर्सचाही समावेश आहे. या ऑफर्स टाटा हॅरियर, नेक्सॉन SUV, टियागो हॅचबॅक आणि टिगोर सेडानवर उपलब्ध आहेत. पण यादीत टाटा अल्ट्रोजचा समावेश नाही.
टाटा टियागोवर 25 हजार रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे. तसेच टाटा आपल्या या मॉडेल्सवर ग्राहकांना विशेष सूट देत असून, त्याची रक्कम अंदाजे 15 हजार रुपयांच्या घरात आहे. तसेच आपल्याला 10 हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनसही मिळतो. त्याचबरोबर टिगोरवरही मिळतेय सवलत टिगोर सेडानला जास्त करून 30 हजार रुपयांची सवलत देण्यात येत आहे. ज्यात 15 हजार रुपयांपर्यंत ग्राहक योजनेंतर्गत आणि 15 हजार एक्सचेंज ऑफरचाही समावेश आहे.
सबकॉम्पॅक्ट एसयूव्हीमध्येही टाटानं इअर अँडच्या निमित्तानं चांगली सवलत दिली आहे. एसयूव्ही काही ठरावीक प्रस्तावांसह उपलब्ध आहे. ज्यात डिझेलच्या मॉडेलवर 15 हजार रुपयांपर्यंतच्या एक्सचेंज ऑफरचा समावेश आहे. नेक्सॉनच्या पेट्रोल मॉडेलवर कोणतीही सवलत देण्यात आलेली नाही. टाटा हॅरिअर एक फ्लॅगशिप SUV आहे. हॅरिअरमध्ये तीन प्रकार उपलब्ध आहेत. ज्यात स्टॅडर्ड, डार्क एडिशन आणि कॅमो एडिशनचा समावेश आहे. डार्क एडिशन, कॅमो एडिशन XZ+ आणि XZA+ वर टाटा मोटर्स ग्राहकांना चांगल्या सवलतीची ऑफर देत असून, जवळपास 25 हजार रुपयांपर्यंत ग्राहकांना सूट मिळत आहे. तसेच 40 हजार रुपयांपर्यंत बोनस सूट मिळत आहे. SUVच्या CAMO आणि डार्क एडिशन (XZ +आणि XZA + वेरिएंट) वर मान्य नाही. स्पेशल एडिशन खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांसाठी 40 हजार रुपयांच्या सूटचा लाभ घेऊ शकता.
महत्वाच्या बातम्या
- घटस्फोट घेण्याच्या निर्णयानंतर IAS टीना डाबी यांनी शेअर आपल्या भावना
- खुशबू, उर्मिला मातोंडकर यांच्यानंतर आणखी एका दिग्गज अभिनेत्रीने सोडली कॉंग्रेसची साथ
- आता सरनाईक कुटुंबाने तयार राहावं! : किरीट सोमय्या
- भारताच्या अंतर्गत मुद्यावर पाकिस्तानने खुपसलं नाक; शेतकरी आंदोलनावरून पाकिस्तानी मंत्र्याची मोदी सरकारवर टीका !
- शरद पवार राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले, थोरातांचा शरद पवारांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

