Share

मोठी बातमी : गडचिरोलीत चकमक, नक्षलवाद्यांच्या अनेक म्होरक्यांचा खात्मा

Published On: 

गडचिरोली – गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली आहे. एटापल्लीमधील पेदी – कोटमी येथील जंगलात झालेल्या या चकमकीत पोलिसांनी १३ नक्षलवाद्यांना ठार केलं आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या सी-६० युनिटकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली सी ६० पथक नक्षलविरोधी अभियान राबवत आहेत. दरम्यान, खात्मा करण्यात आलेल्या नक्षवाद्यांची संख्या वाढू शकते अशी सूत्रांनी माहिती दिली आहे.एटापल्ली तालुक्यातील कोटमी पोलीस मदत केंद्रांच्या हद्दीतील पैदी जंगल परिसरात ही चकमक उडाली आहे.

या संपूर्ण भागाची अर्थव्यवस्था तेंदू पत्ता संकलनावर अवलंबून आहे. याच तेंदू पत्ताच्या किंमती ठरवण्यासाठीची बैठक नक्षलवाद्यांनी एका गावात बोलावली होती. या माहितीच्या आधारेच पोलिसांनी आखणी करत बैठक सुरु असताना दबा धरून बसून, त्यांनी ही कारवाई केली.दरम्यान,अद्यापही या भागात शोधमोहिम आणि सुरु असून हा संपूर्ण भाग छत्तीसगढच्या सीमेनजीक असल्याची माहिती समोर येत आहे.

या भागात नक्षलवाद्यांचा वावर असतो. काही दिवसांपूर्वीच येथील पोलीस चौकीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला होता. पण, सुदैवाने रॉकेटलाँचरच्या हल्ल्यात कोणतंही नुकसान झालं नाही. यानंतरच पोलिसांनी नक्षलवादविरोधी अभियान राबवलं होतं. या अभियानाअंतर्गतच येथे गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी सकाळच्या दरम्यान ही चकमक झाली. नक्षलवाद्यांचे अनेक म्होरके यामध्ये मारले गेल्याची माहिती आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!