🕒 1 min read
मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. कोरोनाच्या या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. मात्र स्पर्धेत कोरनाचा शिरकाव झाला आणि बीसीसीआयने उर्वरित स्पर्धा
स्थगित करण्यात आली आहे.
आयपीएलची स्पर्धा स्थगित झाल्याननंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आपल्या घरी परतला आहे. महत्वाचे म्हणजे, घरी परतल्यानंतर विराट त्याची पत्नी अनुष्का शर्मासह समाजिक कार्यात हातभार लावत आहे. कोरोनामुळे आयपीएल रद्द झाल्यानंतर विराट कोरोना बचाव कार्यात आपले लक्ष केंद्रीत करत आहे.
कोविड १९ रिलीफ मदतीसाठी अनुष्का आणि विराट यांनी केट्टो (Ketto) वर एक मोहीम सुरू केली होती. त्यावर प्रत्येकाने जमेल तेवढ्या पैशाचे योगदान करावे असे आवाहन देखील केले होते. कोणतीही रक्कम जीव वाचवण्यासाठी कमी नाही. परंतु या संघर्षासाठी आम्हाला आपल्या मदतीची आवश्यकता आहे. या मोहिमेत सर्वांना सहभागी होण्याची विनंती अनुष्का आणि विराट यांनी केली होती.
https://twitter.com/viratkohliFab/status/1391268546370412550?s=20
या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ७ कोटींचा निधी जमा करण्याचे लक्ष्य विरुष्कानं डोळ्यासमोर ठेवले आहे. आत्तापर्यंत ३.६ कोटी रक्कम जमाही केली आहे. यातील २ कोटी रक्कम ही विराट-अनुष्का यांनी दान केली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद देण्यासाठी विराट आणि अनुष्काने सगळ्यांचे आभार देखील मानले आहेत.

दरम्यान, युझवेंद्र चहलने विरुष्काच्या उपक्रमाला 95 हजार रुपयांची देणगी दिली, पण यावरून त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. क्रिकेटपटू म्हणून तू कोट्यवधींची कमाई करता, पण मदत मात्र एवढी कमी, असं चहलला सोशल मीडियावर ऐकवण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मुख्यमंत्र्यांचे आवाहन म्हणजे हलवायाच्या घरावर तुळशीपत्र, असला किळसवाणा प्रकार’
- आमचा वाली कोण? लातूरमधील इंटर्न डॉक्टरांचा प्रश्न; विविध मागण्यासांठी काम बंद आंदोलन
- आता ‘या’ राज्यातदेखील खासगी रुग्णालयांमध्येही होणार कोरोना रुग्णांवर मोफत उपचार
- नांदेडचा ऑक्सिजन टँकर पळवला; अशोक चव्हाणांचा गडकरींना फोन आणि मग…
- महाराष्ट्र सावरतोय : नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट तर ६० हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
