🕒 1 min read
Sanjay Raut | मुंबई : संजय राऊत तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अनेक बड्या नेत्यांनी त्यांना फोन करुन त्यांची विचारपूस केली. यावेळी दिल्लीतून भाजप (BJP) पक्षाच्या एका बड्या नेत्याने संजय राऊत (Sanjay Raut) यांना फोन केल्याचं राऊतांनी सांगितलं आहे. तसेच संजय राऊत लवकरच दिल्लीला जाऊन नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची भेट घेणार आहेत.
भाजपचे नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामींनी संजय राऊत यांना फोन करून त्यांची विचारपूस केली आहे. संजय राऊत यांनीच त्याबाबतची माहिती दिली आहे. मात्र, दोन्ही नेत्यांमध्ये काय बोलणं झालं हे राऊत यांनी सांगितलं नाही.
आज सकाळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा फोन होता. तेही आजारी आहेत. त्यांना माझी काळजी होती. मी पवारांना भेटणार आहे. अनेकांचे फोन येत आहे. आता डॉ. सुब्रमण्यम स्वामींचा फोन आला होता, असं राऊत यांनी सांगितलं. राऊत यांना भाजपच्या नेत्यानेच फोन केल्याने अनेक राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
आपल्यासोबत काय घडलं, हे सांगण्यासाठी आपण दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांची भेट घेणार असल्याचं देखील संजय राऊत यांनी सांगितलं आहे. ज्या ज्या लोकांनी हा कट रचला होता. जर त्यांना आनंद झाला असेल तर त्यांच्या आनंदात मी सहभागी आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. तसेच संजय राऊत यांना अटक करण्याचा आदेश दिल्लीवरुन आल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- IND vs ENG T20 WC | इंग्लंडने टॉस जिंकला, भारत करणार प्रथम फलंदाजी
- Gujrat Election | मोठी बातमी! रविंद्र जडेजाच्या पत्नीला गुजरात निवडणूकीसाठी भाजपकडून तिकीट
- Sanjay Raut । “माझी अटक राजकीय होती आणि…”; राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर राऊतांचे सडेतोड प्रत्युत्तर
- IND vs ENG T20 WC | अॅडलेडवर टॉस ठरणार निर्णायक! इतिहास काय सांगतो?
- Sanjay Raut | शहा अन् मोदींची भेट घेणार असल्याचं सांगत संजय राऊतांनी केलं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
