Share

नोकराच्या सांत्वनासाठी जॅकी श्रॉफने थेट गाठलं गाव, मोठ्या मनाचा माणूस!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : अभिनेता जॅकी श्रॉफची लाईफ स्टोरी कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. ‘हिरो’ सुपरडुपर हिट झाल्यानंतरही जॅकी चाळीतच राहत होता. सुपरस्टार बनल्यानंतरही अनेक वर्षे तो चाळीत राहिला. त्याला साईन करण्यासाठी बड्या बड्या निमार्ता दिग्दर्शकांनाही चाळीत यावं लागाायचं. विश्वास बसणार नाही, पण जॅकीने त्याच्या अनेक चित्रपटाचं शूटींग चाळीत केलं. निर्माता-दिग्दर्शक चाळीत शूट करायला तयार नसायचे. पण जॅकीची डिमांड त्यांना असं करायला भाग पाडायची. आजही जॅकीचे पाय जमिनीवर आहेत, ते याचमुळे. असं नसतं तर नोकराच्या सांत्वनासाठी त्यानं थेट पुण्याजवळचं खेडं गाठलं नसतं.

जॅकी श्रॉफचे मावळ चांदखेड येथे फार्म हाऊस आहे. तिथं काम करणा-या एका नोकराच्या वडिलांचं नुकतच निधन झालं. जॅकीला ही गोष्ट समजली आणि तो थेट आपल्या या नोकराच्या घरी सांत्वनासाठी पोहोचला. त्याने थेट मावळ चांदखेड गाठत गायकवाड कुटुंबाची भेट घेतली आणि या कुटुंबाच सांत्वन केलं. जमिनीवर बसून कुटुंबासोबत त्याने गप्पा मारल्या आणि आस्थेने विचारपूस केली

सागर दिलीप गायकवाड असं जॅकीकडे काम करणा-या या नोकराचं नाव आहे. तो जॅकीच्या चांदखेड येथील फार्म हाऊवर काम करतो. त्याचे वडील दिलीप गायकवाड यांचं नुकतच अल्पशा आजाराने निधन झालं. याची माहिती कळताच जॉकी श्रॉफ गायकवाड कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी चांदखेड येथील त्यांच्या घरी पोहोचला. इतकंच नाही तर सागर गायकवाडची आज्जी तान्हाबाई गायकवाड यांच्या शेजारी जमिनीवर बसून त्याने गरीब कुटुंबाला धीर दिला. घरातील लहान थोरांची सर्वांची विचारपूस केली.

महत्वाच्या बातम्या :

PL 2022: आरसीबीचे चाहते मॅक्सवेलच्या परतीसाठी आतूर ; वसीम जाफरने मीम शेअर करत घेतली फिरकी
धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स; व्हिडीओ व्हायरल
IPL 2022: केकेआरला पराभूत करणाऱ्या हसरंगाने केला त्याच्या स्टाईलचा खुलासा ; म्हणाला ‘माझं सेलिब्रेशन नेमार सारखं’
IPL 2022 : “घरात बसून IPL पाहावं लागतंय म्हणून राग येतोय”, CSKच्या खेळाडूची खंत!
“घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षाला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही”, अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!