🕒 1 min read
मुंबई: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अष्टपैलू खेळाडू वानिंदू हसरंगा याने आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करताना पहिला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कार जिंकला. हसरंगा विकेट घेतल्यानंतर खास सेलिब्रेशन करताना दिसला. या सेलिब्रेशन ब्राझीलचा फुटबॉल स्टार नेमार ज्युनियरपासून प्रेरित आहे असे सांगितले आहे.
सामन्यात ४ विकेट्स पटकावणारा हसरंगा (vanaindu hasranga) म्हणाला, “माझा आवडता फुटबॉलपटू नेमार (neymar jr.) आहे आणि तो त्याचा सेलिब्रेशन स्टाईल आहे जो मी करतो. सामन्यात मला फक्त चार विकेट मिळाले तरी मी खरोखर आनंदी आहे. जेव्हा मी खेळायला जातो तेव्हा मी कोणतेही दडपण घेत नाही. त्यामुळेच मला यश मिळते असे वाटते,” हसरंगाच्या नावावर श्रीलंकेसाठी आतापर्यंत T2OI आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये अविश्वसनीय विक्रम आहे. त्याच्या पहिल्या ३५ T20I मध्ये, हसरंगाने केवळ १३.७५ च्या अविश्वसनीय सरासरीने ५७ विकेट्स घेतल्या आहेत.
IPL 2022 मधील कमी धावसंख्येच्या थ्रिलरमध्ये, जेथे गोलंदाजांचा बोलबाला होता, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने कोलकाता नाइट रायडर्सचा तीन गडी राखून पराभव केला. कोलकात्याला केवळ १२८ धावांत गुंडाळल्यानंतर बंगळुरूने पॉवर प्लेमध्ये पहिले तीन फलंदाज गमावले. परंतु शेरफेन रदरफोर्ड (२८), डेव्हिड विली (१८), शाहबाज अहमद (२७), दिनेश कार्तिक (नाबाद १४) आणि हर्षल पटेल (नाबाद १०) यांच्या महत्त्वपूर्ण खेळींनी आरसीबीला चार चेंडू शिल्लक असताना विजय मिळवून दिला.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : “घरात बसून IPL पाहावं लागतंय म्हणून राग येतोय”, CSKच्या खेळाडूची खंत!
- “घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षाला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही”, अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा
- Women’s World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेचा अडथळा दूर करत इंग्लंड फायनलमध्ये; आता गाठ ऑस्ट्रेलियाशी!
- IPL 2022: पलटणसाठी आनंदाची बातमी! मुंबईचा ‘सूर्योदय’ झाला…
- “अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकी सर्व मुद्द्यांवर चर्चा होतेय”, अजित पवारांचा प्रसाद लाड यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
