Share

“घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षाला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही”, अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली: विरोधी कार्यकर्त्यांना मारून सत्ता बळकावणे ही आमची संस्कृती नाही. आमची विचारधारा, आमच्या नेत्याची लोकप्रियता आणि सरकारचे कर्तृत्व या जोरावर सर्वत्र निवडणूक लढवून आम्हाला जिंकायचे आहे. कुटुंबाच्या जोरावर पक्ष चालवणाऱ्यांना लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही. असा टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah target on Congress) यांनी कॉंग्रेसला लगावला आहे.

आम्ही पराभवाच्या भीतीने निवडणुका घेत नाही असे जे म्हणत आहेत, तेच घाबरले आहेत. घाबरणे हा आमचा स्वभाव नाही. विजयाचा एवढा आत्मविश्वास असेल, तर ६ महिन्यांनी निवडणुकीला कशाला घाबरता. नागरिकांचे लोकशाही हक्क हिरावून काँग्रेसच्या पंतप्रधानांनी रातोरात देशावर लादलेल्या क्रूर आणीबाणीला भीती म्हणतात. अशी टीकाही अमित शाह यांनी केली आहे.

निवडणुकीची भीती कशाला, हार-जीत चालूच राहते. लोकशाहीत जनतेचा निर्णय प्रत्येकाने मान्य केला पाहिजे. संसदेत आमचे दोनच सदस्य असतानाही आम्ही घाबरलो नव्हतो, आज 300 हून अधिक आहेत. ‘हम दो, हमारे दो’… या पक्षाला आज विरोधी पक्षाचा दर्जाही नाही. अशी खोचक टीकाही अमित शाह यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!