🕒 1 min read
मुंबई: भारतीय संघाचा माजी खेळाडू वसीम जाफर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. वसीम जाफर त्याच्या मजेशीर मीम्ससाठी ओळखला जातो. वसीम त्याच्या चाहत्यांमध्ये मीम्सच्या माध्यमातून चर्चेत असतो. आरसीबी आणि केकेआर सामन्यासंदर्भात देखील वसीम जाफरने सोशल मीडियावर एक मजेदार मीम शेअर केला आहे. ज्याला चाहते मोठ्या संख्येने लाईक करत आहेत.
KKR आणि RCB यांच्या सामन्यात फाफ डू प्लेसिसच्या (faf du plessis) संघाने बाजी मारली. आरसीबीने आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये पहिल्या सामन्यात पराभव तर दुसऱ्या सामन्यात विजय मिळाला होता. केकेआरविरुद्ध (KKR) आरसीबीच्या (RCB) संघाची सुरुवात खूपच खराब झाली. ज्याने अवघ्या १७ धावांत ३ विकेट गमावल्या. अशा वेळी चाहत्यांना लग्नात व्यस्त असलेल्या मॅक्सवेलची (Glenn maxwell) आठवण झाली. हाच मुद्दा घेत वसीम जाफरने (wasim jaffer) ट्विटरवर एक मीम शेअर केला आहे.
आरसीबीने केकेआरला पराभूत करत स्पर्धेतील पहिला सामना जिंकला आहे. तर ग्लेन मॅक्सवेलचे लग्नही पार पडले आहे. तो लवकरच आरसीबीसोबत जुळणार असल्याचे वृत्त मिळत आहे. आरसीबीच्या मिडल ऑर्डरमधील अडचण केवळ मॅक्सवेल आल्याने दूर होऊ शकते. ज्यामुळे चाहते अजूनही मॅक्सवेलच्या परतीची वाट पाहत आहेत.
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
महत्वाच्या बातम्या
- धकधक गर्ल आणि रितेश देशमुखचा ‘कच्चा बादाम’वर डान्स; व्हिडीओ व्हायरल
- IPL 2022: केकेआरला पराभूत करणाऱ्या हसरंगाने केला त्याच्या स्टाईलचा खुलासा ; म्हणाला ‘माझं सेलिब्रेशन नेमार सारखं’
- IPL 2022 : “घरात बसून IPL पाहावं लागतंय म्हणून राग येतोय”, CSKच्या खेळाडूची खंत!
- “घराणेशाहीवर चालणाऱ्या पक्षाला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही”, अमित शाहांचा काँग्रेसवर निशाणा
- Women’s World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेचा अडथळा दूर करत इंग्लंड फायनलमध्ये; आता गाठ ऑस्ट्रेलियाशी!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
