🕒 1 min read
मुंबई : इंग्लंडचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू सॅम करन याने आयपीएल २०२२ मध्ये सहभागी होऊ न शकल्याबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तो म्हणाला, ”यावेळी मला घरी बसून आयपीएल पाहावे लागत आहे आणि त्यामुळे त्याचा खूप राग येत आहे.”
करनने आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी जबरदस्त कामगिरी केली. मात्र, पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यामुळे तो यंदाच्या आयपीएल हंगामात खेळत नाहीये. आयपीएल २०२१ दरम्यान, त्याने पाठीच्या भागात दुखापत झाल्याची तक्रार केली होती. या कारणास्तव तो २०२१ च्या टी-२० विश्वचषक आणि अॅशेस मालिकेत भाग घेऊ शकला नाही. आयपीएल २०२२ पर्यंत त्याचे पुनरागमन अपेक्षित होते, परंतु इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याला लिलावात न जाण्याचा सल्ला दिला आणि विश्रांती घेण्यास सांगितले.
यामुळेच सॅम करन सध्या आयपीएलचा भाग नाही. जगातील सर्वात मोठ्या टी-२० लीगमध्ये खेळू न शकल्याची खंत त्याला आहे. ईएसपीएन क्रिकइन्फोवरील संभाषणादरम्यान, तो म्हणाला, “मला खूप दुःख आहे की मी यावेळी आयपीएलचा भाग नाही. घरून ही स्पर्धा पाहणे खूप त्रासदायक आहे. मला लिलावात जायचे होते पण गेलो नाही आणि ते झाले. कदाचित हा योग्य निर्णय होता.”
महत्त्वाच्या बातम्या –
- Women’s World Cup 2022 : दक्षिण आफ्रिकेचा अडथळा दूर करत इंग्लंड फायनलमध्ये; आता गाठ ऑस्ट्रेलियाशी!
- IPL 2022: पलटणसाठी आनंदाची बातमी! मुंबईचा ‘सूर्योदय’ झाला…
- “अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकी सर्व मुद्द्यांवर चर्चा होतेय”, अजित पवारांचा प्रसाद लाड यांना टोला
- कोरोनाची नियमावली आणखी शिथिल होणार; उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
- माझी बदनामी करू नको; संजय दत्त यशला असं का म्हणाला?
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
