मुंबई : सध्या सोशल मीडियावर कच्चा बादाम हे गाणं प्रचंड चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीचं ‘कच्चा बादाम’ हे गाणं झालं होतं. खरतरं हे गाणं पश्चिम बंगालमधील शेंगदाणा विक्रेता भुबन बड्याकरने गायलं आहे. त्यानंतर त्या गाण्यावर अनेक व्हिडीओ व्हायरल झाले.
पण यावेळी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि अभिनेता रितेश देशमुखचा या गाण्यावर डान्स करताना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेला हा व्हिडीओ माधुरीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडीओ द फेम गेम या चित्रपटाच्या सेटवरचा आहे. इथे रितेश आणि माधुरी डान्स करताना दिसत आहेत.
महत्वाच्या बातम्या :


