Share

पुणे महापालिकेचा मोठा निर्णय ; म्युकरमायकोसीसच्या उपचारासाठी करणार तीन लाखांची मदत

Published On: 

🕒 1 min read

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कहर माजवला आहे. देशात दररोज विक्रमी कोरोनाबाधितांची नोंद होत असून अयोग्य सेवेवर प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. राज्यात देखील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे इतर राज्यांपेक्षा अधिक गंभीर परिणाम दिसून आले असून अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महाराष्ट्रात अशी भीषण परिस्थिती असतानाच आता राज्यावर म्युकरमायकोसीस या नव्या आजाराने हात पसरायला सुरुवात केली आहे. म्यूकरमायकोसिस हा आजार अनेक रुग्णांना होत असल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना एम्फोटेरीसीन बी चे तब्बल चाळीस ते पन्नास इंजेक्शन द्यावे लागत आहेत. एम्फोटेरेसीन बी इंजेक्शन हे प्रामुख्याने म्युकरमायकोसीसचा संसर्ग कमी करण्यासाठी वापरलं जाते.

या एका इंजेक्शन कोर्सचा एका पेशंट्ससाठीचा खर्चच किमान सात लाखांपर्यंत जातोय, तर इतर खर्च धरून म्युकरमायकोसीसचा एका क्रिटिकल पेशंट्सचे बिल वीस ते पंचवीस लाखांच्या घरात जात असल्याचं सांगितलं जातं. बरं एवढं करूनही काही रूग्णांना त्यांचा डोळा, जबडा असे गमवावे लागत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता पुणे महानगरपालिकेने एक मोठा निर्णय घेतला आहे. या रोगाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या आजाराचा शहरी गरीब योजनेमध्ये समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या आजारावरील उपचारांकरिता तीन लाखांपर्यंत पालिका मदत करणार आहे. शहरातील १४० रुग्णालयांमध्ये या आजारावर उपचार घेता येणार असल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पालिकेकडून शहरी गरीब योजना राबविली जाते. एक लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो. वैद्यकीय उपचारासाठी एक लाख रुपये दिले जातात. तर अन्य गंभीर अजारासाठी तीन लाख रुपये देण्यात येतात. शहरात या योजनेचे २० हजार लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना म्युकर मायकोसीसची लागण झाल्यास उपचारासाठी तीन लाखांपर्यंतचा निधी दिला जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!