पुणे: राज्यात कृषी व अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना तसेच प्रोत्साहन देण्यासाठी कृषी आयुक्तालय स्तरावर स्वतंत्र कृषी व अन्न प्रक्रिया संचालनालयाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. याचे मुख्यालय पुण्यातील कृषी आयुक्तालयात राहणार आहे. राज्य सरकारच्या कृषी व अन्न संबंधी योजना आता संचालनालयामार्फत राबविण्यात येणार आहेत.
यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, जैविक शेती मिशन, कृषी पायाभूत सुविधा निधी योजना, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क, प्रधानमंत्री किसान संपदा योजना यासह इतर प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. सोबतच मनुष्यबळ विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही सर्व कार्य कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे.
दरम्यान राज्यस्तरावर ‘महाराष्ट्र ब्रॅंड’ विकसित करण्यात येणार आहे. यासाठी उद्योजक आणि शेतकऱ्यांची साखळी तयार करण्यात येणार आहे. तसेच सात सदस्यांची एक ‘टास्क फोर्स’ देखील स्थापन करण्यात येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘मोदींना भाजप विचारसरणीचे न्यायाधीश पाहिजे’, पी.चिदंबरम यांची टीका
- आज होणार अजित पवार यांची बैठक, पुण्यातील निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
- आयपीएल स्पर्धेत बीसीसीआयने बायोबबलचे नियम केले कठोर, उल्लंघन झाल्यास कुटुंबावरही होणार कारवाई
- पहिली कसोटी निर्णायक टप्प्यात, विजयासाठी भारताला हव्या १५७ धावा
- पुणे शहरात आज नव्याने २०४ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

