🕒 1 min read
मुंबई: शिवसेनेला सर्वप्रथम एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारत धक्का दिला, त्यांनतर दुसरा धक्का म्हणजे आजच शिवसेनेचा बुलंद आवाज असणारे खासदार संजय राऊत यांना ईडीकडून नोटीस मिळाली आहे. जमीन घोटाळाप्रकरणी त्यांना नोटीस बजावण्यात आली असून त्यांना उद्या अर्थातच २८ जून रोजी चौकशीला जावे लागणार आहे. संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्राचाळ पुनर्विकास घोटाळाप्रकरणी सदरील नोटीस देण्यात आली आहे.
दरम्यान यानंतर लगेच संजय राऊत यांनी ट्वीट करत स्पष्टीकरण दिले आहे. “मला नुकतेच कळले की ईडीने मला समन्स बजावले आहे. चांगले! महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठी लढाई लढत आहोत. मला रोखण्याचे हे षडयंत्र आहे. तुम्ही माझा शिरच्छेद केला तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. मला अटक करा! जय हिंद!”, असे ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.
I just came to know that the ED has summoned me.
Good ! There are big political developments in Maharashtra. We, Balasaheb's Shivsainiks are fighting a big battle. This is a conspiracy to stop me. Even if you behead me, I won't take the Guwahati route.
Arrest me !
Jai Hind! pic.twitter.com/VeL6qMQYgr— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2022
दरम्यान २००६ साली जॉईंट व्हेंचर अंतर्गत गुरू आशिष बिल्डरने पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला. सदरील प्रकल्प २००८ साली सुरू झाला. मात्र, दहा वर्षानंतरही पत्राचाळीचा पुनर्विकास झाला नसल्याचे समोर आले. या गुरू आशिष कंस्ट्रक्शन कंपनीचा संचालक राकेश वाधवान असून वाधवान यांच्यासोबत संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊतांचा संबंध आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IRE vs IND : भारताच्या गोलंदाजाची धुलाई करणाऱ्या आयरिश फलंदाजाला हार्दिक पंड्यानं दिलं ‘खास’ गिफ्ट!
- Eknath Shinde : एकनाथ शिंदे गटातील ३८ बंडखोर आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढला, याचिकेत दावा
- Sadabhau Khot : “… तर तुमच्या बुद्धीची कीव येते”, सदाभाऊ खोत यांचा आदित्य ठाकरेंना टोला
- Kiran Mane : एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेनंतर किरण मानेंचा संताप, पोस्ट शेअर करत म्हणाले
- Sambhaji Raje : “सत्तेत कुणीही या, पण लवकरात लवकर राज्यातील गोंधळ संपवा” ; संभाजीराजेंची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
