🕒 1 min read
मुंबई: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला होता. यानंतर बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांतच बीसीसीआयने उर्वरित स्पर्धेचे आयोजन युएई येथे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याची घोषणा केली.
आयपीएल स्पर्धेला एक महिनापेक्षा कमी कालावधी उरला आहे. सर्व संघ स्पर्धेच्या तयारीत असताना राजस्थान रॉयल्स संघाचा महत्वाचा खेळाडू जोस बटलर आयपीएलमधून बाहेर पडला आहे. युएई येथे होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी आपण उपलब्ध नसल्याची माहिती त्याने स्वतः दिली आहे. कारण येत्या काही दिवसातच जोस बटलरची पत्नी काही दिवसातच आई होणार आहे. त्यामुळे या काळात पत्नीसोबत राहता यावे म्हणून त्याने आयपीएल मधून माघार घेतली आहे.
Jos Buttler will not be part of the remainder of #IPL2021, as he and Louise are expecting a second child soon.
We wish them well, and can't wait for the newest member of the #RoyalsFamily. ???? pic.twitter.com/rHfeQTmvvg
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) August 21, 2021
राजस्थान रॉयल्स संघाने स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. कोरोणा प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या अखेरच्या सामन्यात जोस बटलर ने शतक झळकावले होते. त्यामुळे त्याची अनुपस्थिती राजस्थान रॉयल्स संघासाठी मोठा फटाका असेल. यापूर्वी जोफ्रा आर्चर आणि बेन स्टोक्स यांनी देखील आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- टीम डेव्हिड ठरणार आयपीएल खेळणारा सिंगापूरच्या पहिलाच खेळाडू
- खळबळ! ‘उपमुख्यमंत्री अजित पवार निधीसाठी साथ देत नाहीत’, काँग्रेस मंत्री यशोमती ठाकूर यांचा गंभीर आरोप
- अफगाणिस्तानातील भारतीयांना वाचविण्यासाठी अमेरिकेने घेतला ‘हा’ निर्णय
- नारायण राणेंच्या ‘त्या’ आरोपांवर एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले..
- राज ठाकरेंचा राष्ट्रवादीवर जातीयवादाचा आरोप; खा.सुप्रिया सुळे म्हणाल्या..
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

