Share

टीम डेव्हिड ठरणार आयपीएल खेळणारा सिंगापूरच्या पहिलाच खेळाडू

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारतात सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत कोरोनाचा शिरकाव झाला होता. यानंतर बीसीसीआयने स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांतच बीसीसीआयने उर्वरित स्पर्धेचे आयोजन युएई येथे सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार असल्याची घोषणा केली.

यंदाच्या स्पर्धेत आरसीबीच्या ताफ्यात सिंगापूरचा खेळाडू टीम डेव्हिडचा समावेश करण्यात आले आहे. यासह आयपीएल स्पर्धा खेळणारा सिंगापूरच्या तो पहिलाच खेळाडू ठरला आहे . नुकत्याच पार पडलेल्या काउंटी क्रिकेट स्पर्धेत तो सरे संघाकडून खेळला होता. स्पर्धेत १५ ऑगस्ट रोजी झालेल्या वर्किशायर संघाविरुद्ध त्याने ७० चेंडूत १४० धावांची खेळी केली. यात त्याने ९ चौकार आणि ११ षटकार लागले. टीम डेविड ने सिंगापूर कडून १४ t-२० सामने खेळले आहे.

आयपीएल २०२१ स्पर्धेच्या उर्वरित हंगामासाठी विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर बंगळुरू संघाने तीन बदल केले आहेत. आरसिबिने फिरकीपटू ऍडम झंपा, केन रिचर्डसन, फिन ऍलन, डॅनियल सॅम्स यां खेळाडूंच्या जागी वनिंदू हसरंगा, दुष्मंता चमिरा आणि टिम डेव्हिड यांचा संघात समावेश केला आहे.यातील वानिंदू हसरांगा; दुष्मांता चमिरणे नुकत्याच पार पडलेल्या भारताविरुद्ध मालिकेत चांगली कमिगिरी केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!