गोंदिया : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक मोठा झटका बसला असून गोंदियातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. राज्याचे माजी वित्तमंत्री महादेवराव शिवणकर यांचे पुत्र आणि गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय शिवणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विजय शिवणकर हे आज भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश करणार आहेत. मागील अनेक दिवसांपासून शिवणकर हे नाराज असल्याची चर्चा होती. अखेर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत आपल्या मनगटावरील राष्ट्रवादीचं घड्याळ सोडून भाजपचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे उद्यापासून चार दिवसांच्या विदर्भ दौर्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते विदर्भात मुक्कामाला राहणार असून नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ या पाच जिल्ह्यात प्रत्यक्ष जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- काही राजकीय पक्षांचे घटक त्यांच्यातील नैराश्य…- शरद पवार
- नवाब मलिक यांनी केलेल्या ‘त्या’ आरोपांवर आशिष शेलारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
- आनंदराव अडसूळांच्या अडचणीत वाढ?; अटके पासून अंतरिम दिलासा नाही
- ‘मोदी सरकार आठ दिवसांत ९५ हजार ८२ कोटींचा निधी राज्यांना देणार’
- घरावरील हल्ल्यानंतर खुर्शीद यांची प्रतिक्रिया; म्हणाले,’हिंदुत्व काय करतं पहायचं असेल तर…’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

