नवी दिल्ली : आयपीएल २०२२ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण त्यांचा जलदगती गोलंदाज एनरिक नॉर्ट्जे या हंगामातून बाहेर होऊ शकतो. दुखापतीमुळे त्याने नोहेंबर पासून गोलंदाजी केली नाही.
अशातच साउथ आफ्रिका क्रिकेट बोर्डाचा मेडिकल स्टाफ त्याला आयपीएलमध्ये खेळण्यासाठी परवानगी देणार का? हे पाहणे खूप महत्वाचे आहे. त्याला या दुखापतीमुळे बांग्लादेश मालिकेसाठीही संघात निवडण्यात आले नाही.
आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंपैकी ८ खेळाडूंची बांग्लादेशविरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी निवड करण्यात आली आहे. ज्यामध्ये कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी, रेसी वैन डर डुसेन, डेविड मिलर, क्विंटन डी कॉक, एडेन मार्कराम, ड्वेन प्रिटोरियस आणि मार्को यानसेन यांचा समावेश आहे.
झी न्युजच्या बातमीनुसार एक बीसीसीआय अधिकारी म्हणाला की, बीसीसीआय ग्रॅम स्मिथशी बोलेल आणि प्रयत्न करेल की काही म्हत्वाचे खेळाडू आयपीएलसाठी उपलब्ध होतील. साउथ आफ्रिका क्रिकेट बोर्डाशी आमचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून पॉझिटिव्ह उत्तराची आशा आहे.
महत्वाच्या बातम्या :


