Share

उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का, २१ नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश

Published On: 

ठाणे : उल्हासनगरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या २१ विद्यमान नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यासोबतच १९ माजी नगरसेवकांनीदेखील हातावर घड्याळ बांधले आहे. भाजपचे आणखी १० नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे.

उल्हासनगर शहरात मोठी राजकीय उलथापालथ घडत आहे. माजी आमदार पप्पू कलानी यांच्या सूनबाई आणि उल्हासनगर महापालिकेच्या माजी महापौर पंचम ओमी कलानी यांनीही नगरसेवकपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर टीम कलानीच्या २१ नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत ठाण्यात हा पक्षप्रवेश झाला.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेले सर्व नगरसेवक आज स्वगृही परतले आहेत. या बदललेल्या समीकरणामुळे उल्हासनगरमध्ये आता पुन्हा राष्ट्रवादीची सत्ता येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. पप्पू कलानी जेलच्या बाहेर आल्यानंतर उल्हासनगरातील राजकीय समीकरणं बदलताना दिसत आहे. चारच दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरात जाऊन पप्पू कलानी यांची भेट घेतली होती. रात्री साडेतीन वाजेपर्यंत नेत्यांची चर्चा चालली होती. माजी आमदार पप्पू कलानी पुन्हा राजकारणात सक्रिय होण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!