🕒 1 min read
मुंबई : कोरोनामुळे यंदा जवळपास सर्वच क्रिकेट स्पर्धांना उशीर झाल्यामुळे रणजी करंडक रद्द करण्यात आली आणि त्याऐवजी प्राधान्य देण्यात आले ते मर्यादीत षटकांच्या क्रिकेटला. भारतात नुकतीच सय्यद मुश्ताक अली टी२० ट्रॉफी पार पडली. तमिळनाडूने या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले. त्यानंतर आता विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेला २० फेब्रुवारी पासून प्रारंभ होणार असून १४ मार्च पर्यंत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.
क्रिकेटविश्वावर अधिराज्य गाजवणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडूलकराला मोठा झटका लागला आहे. नुकतीच विजय हजारे ट्रॉफीसाठी मुंबईच्या संघाची घोषणा झाली आहेत. मात्र, या संघात अर्जुन तेंडुलकरला स्थान मिळाले नाही.
महत्वाचे म्हणजे, येत्या 18 फेब्रुवारीला भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेली इंडियन प्रीमिअर लीगच्या 14 व्या पर्वासाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. अर्जुन तेंडूलकर आयपीएलमध्ये पदार्पण करण्यास तयार आहे. त्याने आयपीएल 2021 च्या लिलावात आपले नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, याआधीच त्याला मोठा धक्का लागला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगतिपथावर
- बीडमध्ये विजेचे दोन बळी; कर्नाटकात कामासाठी गेलेला तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू
- जाणून घ्या भाजपा खासदारांनी सांगितलेला ‘नरेंद्र मोदी’ नावाचा फुल फॉर्म !
- केंद्र सरकार Twitter विरोधात आक्रमक; काही बड्या अधिकाऱ्यांना अटक होण्याची शक्यता
- लोकोपयोगी कामांसाठी उदयनराजेंची धडपड; केंद्रीय मंत्र्यांच्या भेटींचा लावला धडाका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
