🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : भेटी लागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी…एक एक पाऊल टाकत आता विठ्ठलाचं रुप पाहण्यासाठी आता डोळे आतूर झाले आहे. आज आषाढी असल्यामुळे पंढरपूर वारकऱ्यांनी फुलून गेलं आहे. अलोट गर्दी पंढरपुरात झाली आहे. चंद्रभागेचे स्नान आणि दर्शन विठ्ठलाचे घडावे मज जन्मोजन्मी अशी प्रत्येक वारकऱ्याची इच्छा असते. अशी इच्छा घेऊन आज हजारो वारकरी पंढरपुरात दाखल झाले आहेत.
दरम्यान, आषाढी एकादशीनिमित्त जेष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी विठ्ठलभक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत.‘आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी, तुमच्या परिवाराला अनेक अनेक शुभेच्छा. विठ्ठल- रखुमाईची कृपा आपण सर्वांवर सदैव राहू दे हीच प्रार्थना’ असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. यासोबतच काही अभंगाच्या ओळीदेखील त्यांनी लिहिल्या आहेत.
T 3224 – Aaj Ashadhi Ekadas ke pavan avsar per Aapko Aur aapke pure parivar ko anek anek Shubhkamnaye..Vitthal -Rakhumai ji ki krupa aap sab per sada bani rahe yahi prarthna.
आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…
चन्द्रभागेच्यातीरी उभा मंदारी, तो पहा विटेवरी | ???????????????? pic.twitter.com/UaSBz2gbNu— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 12, 2019
T 3224 – टाळ वाजे, मृदुंग वाजे
वाजे हरीचा विणा ||माऊली निघाले पंढरपूरा
मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला ||||जय जय राम कृष्ण हरी||
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा…!
Jai hari Vitthal !! ???????????????????????? pic.twitter.com/f0aLShtsjR— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 12, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
