मुंबई : विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद फडणवीस यांनी संजय राऊत यांच्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमस्थळी फडणवीस-राऊत यांची गळाभेटही झाली होती. त्यानंतर आणखी एक राजकीय वर्तुळात भुवया उंचावणारी घटना घडली. भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहावर हे दोन्ही नेते भेटले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड बराचकाळ चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.
‘भेटीत माझ्या मतदारसंघातील विकास कामांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळाबाबतही आमच्यात बोलणी झाली, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. ‘आजच्या भेटीमुळे ज्यांना राजकीय चर्चा करायची आहे, त्यांनी ती करू द्या. शिवसेना काही अंतिम श्वासापर्यंत आमचा शत्रू असणार नाही, असे मुनगंटीवार यांनी भेटीबाबत वक्तव्य केले असल्याने भेटीबाबत संभ्रम वाढला होता.
दरम्यान, शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी याबाबत भाष्य केले आहे. ‘भाजपने या आधीच सर्व जबाबदारी सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे द्यायला हवी होती. आज ही वेळ आली नसती, असं म्हणत उदय सामंत यांनी विद्यमान भाजपच्या नेतृत्वाला टोला लगावला आहे.
‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुधीर मुनगंटीवार काल भेटले. दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. पण काय चर्चा झाली हे माहीत नाही. सुधीरभाऊ हे माझे विधीमंडळातील ज्येष्ठ सहकारी आहेत. त्यांनी पूर्वीच पुढाकार घेतला असता तर आज ही वेळ आली नसती. मागच्या पाच वर्षात मी सुधीरभाऊंसोबत काम केलं आहे. त्यांच्याकडे या आधीच सर्व जबाबदारी दिली असती तर आज हे कटू प्रसंग उद्भवले नसते, अस म्हणत उदय सामंत यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेवासे तालुक्यातील रस्त्यांना ‘शंभर कोटी’चा निधी, नेवासा -शेवगाव रस्त्याची साडेसाती सुटणार
- रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग नंतर मिया खलिफा उतरली शेतकऱ्यांच्या समर्थनात !
- आगामी कसोटी सामन्यातील भारताच्या कामगिरीवर इंग्लंडच्या दिग्गजाचे भाष्य !
- मनपा कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, राष्ट्रीय निवृत्ती योजना लागू होणार
- शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देणे हे शिवसेनेचे ढोंग; संजय निरूपमांचा टोला


