🕒 1 min read
मुंबई : टी-सीरिजचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि कॅसेट किंग गुलशन कुमार यांचा मुलगा आणि टी-मालिका कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काम मिळवून देण्याच्या आमिषाने 30 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप भूषण कुमारवर करण्यात आला आहे. त्याच्याविरूद्ध मुंबईच्या डीएन नगर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
पिडीत तरुणीने भूषण कुमार याने काम देण्याच्या आमिषाने 2017 ते 2020 पर्यंत तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तीन वेगवगेळ्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार करण्यात आला असल्याचे पिडीत तरुणीने सांगितले आहे. तसेच आरोपीने तिचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी तिला दिली होती.
यापूर्वी देखील भूषण कुमार यांच्यावर असे आरोप केले गेले आहेत. मीटू मूवमेंटच्या माध्यमातून मॉडेल मरीना कुंवर यांनीही भूषण कुमारवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. भूषण कुमारचे लग्न झाले असून त्याची पत्नी दिव्या खोसला कुमार बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहे. दिव्या आणि भूषण यांना एक मुलगा देखील आहे.
महत्वाच्या बातम्या
- आयटीआयसाठी प्रवेशप्रक्रिया सुरु : ९६६ आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा उपलब्ध !
- ‘नानांच्या नाना तऱ्हा; ते सकाळी एक बोलतात, दुपारी दुसरं आणि संध्याकाळी…’
- स्वप्नील लोणकरच्या कुटुंबियांना शिवसेनेनं केली १० लाखांची मदत; एकनाथ शिंदेनी केलं कुटुंबियांच सांत्वन
- पंजाब नॅशनल बँककडून नोकर धारकांना मिळणार 3 लाखांचा लाभ
- ‘स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही देशद्रोह कायदा गरजेचा आहे का ?’ ; सर्वोच्च न्यायालयाचा सवाल


