Share

भुजबळ समर्थकांची देशभर निदर्शने

Published On: 

नाशिक : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यावर सूडबुद्धीने सुरु असलेल्या कारवाईच्या विरोधात आज मध्यप्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, राजस्थानासह देशातील अनेक राज्यांमध्ये त्याचबरोबर महाराष्ट्रात मुंबईसह राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयांवर भुजबळ समर्थकांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी भुजबळ समर्थकांकडून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकारी व तहसिलदार यांच्यामार्फत निवेदन पाठविण्यात आले.

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील तमाम बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी, भटके-विमुक्त, अल्पसंख्यांक आणि कोट्यावधी शोषित-पिडीत व वंचितांचे आशास्थान असलेले छगन भुजबळ तसेच नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपाखाली चौकशी यंत्रणांनी गेल्या २२ महिन्यांपासून चौकशीच्या नावाखाली डांबून ठेवलेले आहे. बंदी करून जामीन न देणारा कायदा घटनाबाह्य आहे असा सर्वोच्च न्यायालयाने नुकताच न्यायनिवाडा दिला आहे. तरीही त्यांना केवळ आकसापोटी कारागृहात डांबून ठेवण्यात आले आहे. त्यांचा दोष अद्याप सिद्ध झालेला नाही तरीही केवळ खोट्या-नाट्या आरोपांमुळे देशातील बहुजनांच्या या नेत्याला कारागृहात डांबून ठेवणे हा त्यांच्यावर खूप मोठा अन्याय असल्याची भावना यावेळी देशभरातील भुजबळ समर्थकांनी व्यक्त केल्या.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!