Share

भिमा-कोरेगाव येथे अभिवादनासाठी भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद उपस्थित राहणार 

Published On: 

🕒 1 min read

पुणे : भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी 1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आजाद उर्फ रावण हे उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भिमाकोरेगाव अभिवादन महारॅली आयोजित करण्यात येणार आहे.

या रॅलीची संपूर्ण तयारी झाली असल्याचे भीम आर्मी पुणे शहर अध्यक्ष अभिजीत गायकवाड यांनी कळविले आहे. 1 जानेवारी रोजी अभिवादनासाठी येणाऱ्या चंद्रशेखर आजाद यांच्या दौऱ्याचे निमित्त साधत पुणे परिसरांमध्ये भीम आर्मी च्या संघटनात्मक बांधणीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांचा मेळावा, कार्यकारिणीची बैठक, व हितचिंतक समर्थक यांच्यासमवेत विविध बैठकांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे.

सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पूर्वतयारी पूर्ण झाली असून या नियोजित कार्यक्रमांमुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह निर्माण झालेला आहे व याचा आगामी काळात संघटना बांधणीसाठी मोठा फायदा होणार असल्याचेही अभिजीत गायकवाड यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!