🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यामुळे पश्चिम बंगालचं राजकारण ढवळून निघालं आहे. रोड शो, सभा, लंच डिप्लोमसी आणि छोट्यामोठ्या नेत्यांचा पक्षप्रवेश आदी कारणांमुळे भाजपने बंगालमधील वातावरण चांगलेच तापले आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने खास रणनीती तयार केली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण 294 जागा असून त्यापैकी 200 हून अधिक जागा जिंकण्याचं लक्ष्य भाजपनं समोर ठेवलं आहे.
For all the hype AMPLIFIED by a section of supportive media, in reality BJP will struggle to CROSS DOUBLE DIGITS in #WestBengal
PS: Please save this tweet and if BJP does any better I must quit this space!
— Prashant Kishor (@PrashantKishor) December 21, 2020
या दरम्यान मुख्यमंत्री ममता बनर्जी यांचे राजकीय सल्लागार प्रशांत किशोर यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मीडियाचा एक वर्ग भाजपच्या समर्थनाचे वातावरण तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. यावरून हे स्पष्ट होत आहे की भाजप 10 चा आकडा देखील पार करू शकणार नाही अशी स्थिती असून जागा वाढवण्यासाठी संघर्ष करत आहे. भाजपने पश्चिम बंगालमध्ये चांगल्या जागा मिळवल्या तर मी ट्विटर सोडून देईन, असेही ते म्हणाले.
तर दुसऱ्या बाजूला एका सभेत बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले,आज एक माजी खासदार आणि तृणमूल काँग्रेसमधील आमदार भाजपामध्ये आले आहेत. ही तर सुरूवात झाली आहे. निवडणूक येईपर्यंत ममता दीदी तुम्ही एकट्याच राहाल असं भाकीत शाह यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नेपाळमध्ये राजकीय भूकंप! राष्ट्रपतींनी संसद केली बरखास्त
- भारतात मुस्लिमांचा अल्पसंख्यांक दर्जा संपुष्टात यावा- साक्षी महाराज
- पंतप्रधान मोदींच्या ‘मन की बात’च्या वेळी थाळीनाद करा, शेतकऱ्यांचे आवाहन
- दुखापतग्रस्थ मोहम्मद शमीच्या जागी लागणार ‘या’ युवा खेळाडूची वर्णी
- सर्वांच्या लाडक्या ‘शनाया’ला मालिकेतून वगळणार?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
