🕒 1 min read
नवी दिल्ली: उत्तर प्रदेशच्या निवडणुका (UP Elections) तोंडावर आलेल्या असताना भाजपला तिथे मोठा धक्का बसत आहे. निवडणुकीपूर्वी मंत्री स्वामी मौर्य यांनी राजीनामा दिला त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये भाजपला मोठा धक्का बसला. स्वामी मौर्य यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अखिलेश यादव यांची भेट घेत समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे.
स्वामी प्रसाद मौर्य (Swami Prasad Maurya) यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या (BJP) आणखी तीन आमदारांनी पक्ष सोडला (3 more MLAs left the bjp party) आहे. कानपूर देहाट आणि बांदा येथील आमदारांनीही भाजपचा राजीनामा दिला आहे. शाहजहांपूरचे तिल्हारचे आमदार रोशनलाल वर्मा यांनीही भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे.
भाजप सोडल्यानंतर रोशनलाल वर्मा (Roshanlal Varma) म्हणाले की, स्वामी प्रसाद मौर्य जिथे जातील तिथे त्यांच्यासोबतच राहू. भाजप सरकारमध्ये आमची उपेक्षा झाली आहे. यूपीमध्ये भाजपचे नाही तर अधिकाऱ्यांचे सरकार आहे. लोकभवनात दोन तास बसायचे. रोशनलाल वर्मा यांनी मंत्री सुरेश खन्ना यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला.
महत्वाच्या बातम्या:
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; शरद पवारांची पहिल्यांदाच प्रतिक्रीया
- ‘मुख्यमंत्रीच प्रत्येक निर्णय घेतात’; भाजपच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर
- हातात भगवद् गीता अन् टीशर्टवरील ”त्या” संदेशामुळे उर्फी जावेद पुन्हा चर्चेत
- मग ते २० टक्के नागरिक कोण? योगींच्या ‘त्या’ वक्तव्यावरून पवारांचा टोला
- राष्ट्रवादी पक्ष उत्तर प्रदेशात निवडणूक लढणार; शरद पवारांचे मोठे विधान
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
