Share

‘मुख्यमंत्रीच प्रत्येक निर्णय घेतात’; भाजपच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर

Published On: 

मुंबई: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीवरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी निशाना साधत शरद पवारांकडे महाराष्ट्र शासनाचे असे कोणते संविधानीक पद आहे ज्यामुळे ते एसटी संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेणार आहेत, अशी टीका केली होती. त्याला आज मुंबई इथे झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान भाजप नेते अतुल भातखळकर (BJP Leader Atul Bhatkhalkar) यांनी केलेल्या त्या टीकेला राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombre) यांनी देखील प्रतिउत्तर दिले आहे. देशाचे नेते शरद पवार यांचे संविधानिक पद विचारणाऱ्या अडगळीला पडलेल्या सत्तापिपासुना मानसिक उपचाराची गरज आहे. पद आणि पत समजून घेण्यासाठी “अतुल” नीय कार्य करावं लागतं. असा खोचक टोला रुपाली पाटील ठोंबरे यांनी अतुल भातखळकर यांना लगावला आहे.

आज झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार यांनी भाजपच्या टीकेला उत्तर देताना स्पष्ट सांगितले की, मुख्यमंत्रीच प्रत्येक निर्णय घेतात, असं शरद पवार यांनी सांगितले आहे. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांवर देखील भाष्य केले आहे. तसेच उत्तर प्रदेशमध्ये परिवर्तन येणार असंही शरद पवारांनी यावेळी सांगितले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर या राज्यांमध्ये निवडणूक लढवणार असल्याचेही पवारांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!