Share

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत त्रुटी; शरद पवारांची पहिल्यांदाच प्रतिक्रीया

Published On: 

मुंबई :  पंजाबच्या दौऱ्यावर असताना फिरोजपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) सुरक्षेतील त्रुटीवरून देशातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजप नेत्यांनी कॉंग्रेस तसेच पंजाब सरकारवर चांगलीच टीका केली होती. कॉंग्रेस नेत्यांनी देखील भाजपच्या टीकांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. दरम्यान, या प्रकरणावर पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईत आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना पवार म्हणाले की,’सुरक्षेविषयी अधिक भाष्य करण्याची गरज नाही. सुप्रीम कोर्टाने त्याच्या चौकशीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. त्यातून वास्तव समोर येईल. पंतप्रधान ही एक संस्था आहे आणि त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही केंद्र असो किंवा राज्य सर्वांवर असते. त्याची खबरदारी घेतलीच पाहिजे याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. सर्वोच्च न्यायालयाने एकदा त्याच्या चौकशीसाठी व्यवस्था नेमली असेल तर त्यावर कोणतंही वक्तव्य करणं योग्य नाही.’

दरम्यान, ५ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) यांची पंजाबमधील फिरोजपूर येथील सभा सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर आंदोलकांमुळे सुमारे १५ ते २० मिनिटे अडकून पडला. तद्पश्चात राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून या मुद्द्यावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका रंगल्याचे बघायला मिळत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!