🕒 1 min read
मुंबई : शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेने हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर काल सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आज पार पडली. शिवसेनेच्या वतीने आणि शिंदे गटाच्या वतीने परवानगी मिळावी, यासाठी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडली. संपूर्ण राज्याच्या राजकीय वर्तुळाचं या सुनावणीकडे लक्ष लागलं होत. आता या वादावर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने या प्रकरणात सुरवातीला शिंदे गटाकडून दाखल केलेली हस्तक्षेप याचिका फेटाळली.
यानंतर न्यायालय ठाकरे गटाच्या याचिकेवरील निकालाचं वाचन केलं. शिवसेनेला कोर्टाने अखेर परवानगी दिली आहे. शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांची याचिका फेटाळतानाच कोर्टाने मुंबई महापालिकेचं म्हणणंही खोडून काढलं आहे. त्यामुळे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच होणार आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोर्टाने दिलेला निर्णय शिंदे गटाला मान्य असल्याचे गोगावले यांनी सांगितली आहे. आता शिंदे गटाला BKC मैदानावर दसरा मेळावा घ्यावा लागणार आहे. त्यांनी सांगितले की आम्हाला शिवाजी पार्कचे मैदान कार्यकर्त्यांच्या सोयीसाठी पाहिजे होते. कारण तिथे जवळच हरबल लाईन, पश्चिम लाईन, मध्य लाईन आहे. आणि यांचे शिवाजी पार्क हे सेंटर आहे, असं ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- Anil Parab | शिवसेनेचा दसरा मेळावा ‘शिवतिर्थ’वर! न्यायालयाच्या निकालानंतर अनिल परब यांची पहिली प्रतिक्रिया
- Health Tips | बदलत्या हवामानामध्ये शरीर सुदृढ ठेवायचे असेल, तर करा ‘या’ काढ्याचे सेवन
- Ajit Pawar | “मला गृहमंत्री व्हायचं होतं. मात्र, वरिष्ठांनी…”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत
- Hero Electric Scooter | इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करत आहात,तर हिरो इलेक्ट्रिकच्या ‘या’ मॉडेल्सचा नक्की विचार करा
- Shivsena | शिंदे गटाला मोठा धक्का! न्यायालयाने शिवसेनेला ‘शिवतिर्थ’वर दसरा मेळाव्याची दिली परवानगी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
