Share

मुंबई महापालिकेच्या नोटिशीप्रकरणी सोनू सूदची उच्च न्यायालयात धाव !

Published On: 

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत नंतर आता अनधिकृत बांधकाम प्रकरणी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. जुहू येथील सहा मजली निवासी इमारत आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर केल्याप्रकरणी बीएमसीने अभिनेता सोनू सूद विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

जुहू येथील एबी नायर रोडवरील शक्ती सागर बिल्डींगचे रुपांतर आवश्यक त्या परवानग्या न घेता केल्यामुळे पालिकेने जुहू पोलीस ठाण्यात सूद विरोधात तक्रार केली आहे. सहा मजली निवासी इमारतीचे आवश्यक परवानग्या न घेता हॉटेलमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. पालिकेने या गोष्टीवर आक्षेप नोंदवला होता.

दरम्यान सोनू सूदने दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आधीच बीएमसीकडून युझर चेंजसाठी परवानगी घेतलेली आहे आणि सध्या ते महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून परवानगी मिळण्याची प्रतिक्षा करत आहेत. सोनू सूदने या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयात उद्या सुनावणी होणार असून या इमारतीमध्ये कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम केलेले नाही, असा त्याच्या वकिलांनी केला आहे. त्यामुळे, उच्च न्यायालय लॉकडाऊन काळात ‘मसीहा’ बनलेल्या सोनूला दिलासा देणार की कारवाई होणार हे महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!