Share

दिल्ली दंग्याला तुकडे – तुकडे गॅंग जबाबदार : भाजप

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : सीएए आणि एनपीआर च्या विरोधामध्ये सध्या देशामध्ये एक अशांततेचे वातावरण निर्माण झाले आहे. गेले अनेक दिवसांपासून संपूर्ण दिल्ली मध्ये हिंसाचार पेटलेला आहे, हा हिंसाचार सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे फोफावला आहे, यामुळे देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी कॉंग्रेस ने केली होती.

मात्र आता या सर्व प्रकरणाला एक वेगळ वळण लागत असल्याचे पाहायला मिळत आहे, याचे कारण असे कि, दिल्लीतील भाजपा चे नेते तेजेंद्र पाल सिंग बग्गा यांनी ट्वीटर च्या माध्यमातून उमर खालिद यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे यामध्ये उमर खालिद हा CAA आणि NPR च्या विरोध प्रदर्शनासाठी १७ फेब्रुवारी रोजी एका सभेला संबोधित करत होता यावेळी, डोनाल्ड ट्रम्प २४ तारखेला भारतामध्ये येणार आहेत यावेळी आम्ही रस्त्यावर उतरून त्यांना दाखवून देऊ कि मोदी हे देशामध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, महात्मा गांधीचे विचार नष्ट करत आहेत.

उमर खालिद यांच्या भाषणाचा व्हिडिओ शेअर करत बग्गा यांनी दिल्लीतील हिंसाचाराला तुकडे-तुकडे गॅंग जबाबदार आहे असे म्हंटल आहे,तसेच याच जिहादी ताकदीने दिल्ली मध्ये हिंसाचार पेटवण्यासाठी कट रचला असल्याचा आरोप बग्गा यांनी केला.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!