Share

वारकऱ्यांचा कार्तिकी वारी करण्याचा निर्धार, मायबाप पांडुरंगासमोर केलं भजन आंदोलन

Published On: 

🕒 1 min read

पंढरपूर : वारकरी परंपरेमध्ये ‘आषाढी, कार्तिकी विसरुनका मज, सांगतसे गुज पांडुरंग’, या उक्तिप्रमाणे वारकरी संप्रदायात वारी नित्य नियमाला महत्व आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी भाविकांनी सर्व उत्सव शासन सूचनांचे पालन साजरी केले. कोरोना महामारीत वारकरी संप्रदयाने शासनाला सहकार्य केले.

परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने शासनाने बाजारपेठा, एस.टी. बसेस , चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे येणाऱ्या कार्तिकी वारीला पारंपारिक दिंडी व पालख्या घेऊन येण्यासाठी ५० भाविकांना सर्व नियम लागू करुन परवानगी देण्यात यावी, दिंडीला पंढरपूरमध्ये प्रदक्षिणा करण्यात परवानगी द्यावी, आळंदी येथील समाधी सोहळा, नगर प्रदक्षणा व पारंपारिक कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात यावी.तसेच पंढरपूर ते आळंदी पायी जाणाऱ्या दिंडीला ५० भाविकांची परवानगी द्यावी. यांसह विविध मागण्यांसाठी विठ्ठल मंदिरासमोर नामदेव पायरी येथे भजन आंदोलन करण्यात आले.

यावेळी वारकऱ्यांनी कार्तिकी यात्रेस परवानगी द्यावी. यावेळी वारकरी संप्रदाय शासनाचे सर्व नियमांचे पालन करतील. जर शासनाने कार्तिक वारीत अडथळा निर्माण केल्यास प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अखिल भाविक वारकरी संघटनेचे अध्यक्ष सुधाकर इंगळे महाराज यांनी दिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!