Share

राष्ट्रवादीच्या आणखी एका बड्या नेत्याने कोरोनाला केलं चीतपट !

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्य लोकांपासून ते अनेक नेते,कलाकार,खेळाडू या विषाणूच्या विळख्यात अडकल्याचे दिसून येत आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे यांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. तर, माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सरकारी रुग्णालयातून उपचार घेऊन कोरोनमुक्त झाले होते.

हे सर्व राजकीय नेते विळख्यात असतानाच राष्ट्रवादीचे नेते व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील यांना कोरोनाची लागण झाली होती. २९ ऑक्टोबर रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांनी स्वतः ट्विट करून संपर्कात आलेल्यांना दक्षता घेण्याचे आवाहन केलं होतं. आता, दिलीप-वळसे पाटील यांनी कोरोनाला चीतपट केलं आहे.

“आपणा सर्वांचे आशीर्वाद, प्रार्थना व माझ्यावर उपचार करणारे कोरोनायोद्ध्ये डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफ यांच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझ्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त करणाऱ्या सर्व हितचिंतकांचा मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद!” असं ट्विट करून त्यांनी कोरोनमुक्त झाल्याचं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!