Share

#BoycottAmazon: अ‍ॅमेझॉन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, का व्यक्त केला जातोय संताप?

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : मराठी भाषिक अस्मिता जपण्याचा आग्रह धरणार्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ड या कंपन्यांना त्यांच्या ॲप मध्ये मराठी भाषा वापरण्याचा इशारा दिला होता. यावेळी मनसेने या कंपन्यांच्या ऑफिसला भेट देऊन सात दिवसाचा इशारा देखील दिला होता. दिवाळीच्या पार्श्ववभूमीवर अ‍ॅमेझॉन अजून एका वादात सापडली आहे. ट्विटर वरती #BoycottAmazon हा ट्रेंड चालू आहे.

अ‍ॅमेझॉनवर हिंदू संस्कृतीचा अपमान  करणाऱ्या गोष्टींची विक्री करण्यात येत असल्याने, अ‍ॅमेझॉन कंपनी  पुन्हा एकदा वादात  सापडली. अनेक भारतीयांनी ट्विटरवरुन  #BoycottAmazon वापरुन कंपनीच्या प्रोडक्टवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. अ‍ॅमेझॉनवर हिंदू संस्कृतीचा अपमान करणाऱ्या गोष्टींची विक्री केली जात असल्याचा आरोप नेटकऱ्यांनी केला आहे. खास करुन दारामध्ये टाकायच्या डोअर मॅटवर म्हणजेच पायपुसण्यांवर ‘ओम’चे पवित्र चिन्ह तसेच अंतर्वस्त्रांवर हिंदू देवी-देवतांची चित्र असल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.

https://twitter.com/TannuPriyah/status/1326007668310331398

अनेक देशांमध्ये हिंदू संस्कृतीमध्ये मानाचे स्थान असणाऱ्यादेवी-देवतांचे फोटो असणारे प्रोडक्ट विकले जातात. यामध्ये अगदी डोअर मॅटपासून ते अंतर्वस्त्रांपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश आहे. याच प्रोडक्टचे फोटो पोस्ट करत परदेशातील तसेच भारतातील अनेक ट्विपल्सने अ‍ॅमेझॉनने हे प्रोडक्ट विकणे तातडीने बंद करावे अशी मागणी केली आहे.

अ‍ॅमेझॉन विरोधात अशाप्रकारे आक्षेप घेण्याची ही पहिली वेळ नसून याआधी देखील अश्याच प्रकारचे प्रॉडक्ट विक्री बद्दल आक्षेप घेण्यात आला होता. यापूर्वीही हिंदू देवी-देवतांचे फोटो असणारे सामान विक्रीसाठी उपलब्ध केल्याप्रकरणी अ‍ॅमेझॉन विरोधात अनेकांनी आवाज उठवला होता. मात्र, त्यावेळी अशा वस्तू यापुढे आमच्या माध्यमातून विकल्या जाणार नाहीत असं कंपनीने म्हटले होते. मात्र, आता पुन्हा एकदा असाच प्रकार समोर आल्याने अनेकांचा यासंदर्भात ट्विटवरुन आक्षेप नोंदवला गेला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!