Share

भय्युजी महाराज आत्महत्या प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय, तिघे दोषी

Published On: 

🕒 1 min read

इंदोर : भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणी इंदोर कोर्टाने मोठा निकाल दिला आहे. मध्य प्रदेशातील प्रसिद्ध भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात कोर्टाने तीन जणांना दोषी ठरवले आहे.  इंदोर जिल्हा न्यायालयाने सेवक विनायक, ड्रायव्हर शरद आणि शिष्या पलक यांना दोषी ठरवले आहे. तिघांनाही प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. भय्यू महाराज यांनी १२ जून २०१८ रोजी सर्व्हिस रिव्हॉल्वरने स्वतावर गोळी झाडून आत्महत्या केली होती.

भय्यू महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांनाही दोषी ठरवण्यात आले आहे. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असे, हे न्यायालयाने मान्य केले. न्यायालयाने शिष्य पलक, शरद आणि विनय यांना आयपीसी कलम ३०६ अंतर्गत दोषी ठरवले आहे.

इंदोरमधील भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी या तीन आरोपींना जानेवारी २०१९ मध्ये अटक केली होती. त्यानंतरही हे तिघे मिळून महाराजांचे आर्थिक आणि मानसिक शोषण करत असल्याचे समोर आले होते. भैय्युजी महाराजांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये विनायकचा उल्लेखही केला कारण ते भय्यूजींचे १६ वर्षांचे एकनिष्ठ सेवक होते.

भय्यू महाराज यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात मुलगी कुहू आणि दुसरी पत्नी आयुषी यांच्यातील वाद जगजाहीर झाला होता. पण नंतर तपास केला असता त्यांच्या जवळचे लोकच त्यांच्या जीवाचे शत्रू निघाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!