Share

बार्शीच्या ‘आर्यन’ला ‘भैरवनाथ’ पावणार, साखर कारखाना चालवण्यास घेण्याची मंत्री सावंतांची घोषणा

Published On: 

विरेश आंधळकर: सोलापूर जिल्ह्य बँकेच्या ताब्यात असणारा बार्शी तालुक्यातील आर्यन साखर कारखाना चालवण्यास घेणार असल्याचं जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. भैरवनाथ शुगरच्या माध्यमातून सावंत यांच्याकडून ‘आर्यन’ला पुनरुज्जीवन मिळणार असल्याने तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

थकीत कर्जामुळे आर्यन कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेने घेतला आहे. २०१४ मध्ये हा कारखाना रीतसर पद्धतीने भोसले – नलावडे यांच्या कुमुद शुगरकडे हस्तांतरित करण्यात आला होता. साखर आयुक्तांकडून गाळपाची परवानगी घेत कुमुदाकडून गळीत हंगाम चालवण्यात आला. मात्र पुढे शेतकऱ्यांची देणी व थकीत कर्जामुळे सोलापूर जिल्हा बँकेने कारखान्याचा ताबा घेतला होता.

साखर उद्योगातील अडचणीमुळे कारखाना बंद आहे. हजारो शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून हा कारखाना चालवण्यास घेणार असल्याचं तानाजी सावंत यांनी सागितले आहे. दरम्यान, या संदर्भात भैरवनाथ शुगरकडून जिल्हा बँकेशी सकारात्मक चर्चा सुरु असून लवकरच हस्तांतरन होण्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!