टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहे. विधानसभा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दौरे, गाठीभेटी यांसारख्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. तसेच एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचे सत्र पाहायला मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. धनंजय मुंडे एका सभेदरम्यान बोलत होते. यावेळी मुंडे म्हणाले कि, फक्त मतांसाठी पाकिस्तान विरुद्ध बोलणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशप्रेम बेगडी आहे, असे ते यावेळी म्हणाले.
तसेच पुढे बोलताना धनजंय मुंडे म्हणाले, पाकिस्तानविषयी इतका द्वेष असताना मोदींना त्यांच्या सरकारनेच पाकिस्तानमधून आणलेला कांदा आणि साखर कशी चालते? नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचा केक कसा चालतो?, असा सवाल यावेळी मुंडेंनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. तसेच गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा नाशिक येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत समारोप झाला. तसेच राष्ट्रवादीची शिस्वराज्य यात्रा गुरुवारी रायगड जिल्ह्यातील कर्जतमध्ये होती.
फडणवीस आणि ठाकरेंनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला -जितेंद्र आव्हाड
शिवसेना प्रवेशावर उर्मिला मातोंडकर म्हणाली…
‘नागरिकांची संमती असेल अशा जागी नाणार प्रकल्प उभारण्यास काही हरकत नाही’
तुम्ही गुजरातमध्ये दंगली घडवल्या, पवार साहेबांनी मुंबईत दंगल शांत केली – मुंडे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

