Share

‘मोदी देशाची संपत्ती नव्हे तर, युवकांची स्वप्ने विकत आहेत’

Published On: 

मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी सहा लाख कोटी रुपयांच्या राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइनची घोषणा केली आहे. एनएमपी अंतर्गत, सरकार प्रवासी गाड्या, रेल्वे स्टेशन, विमानतळ, रस्ते आणि स्टेडियम खाजगी कंपन्यांना डागडूजीसाठी देऊन पैसे उभा करेल. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या योजनेतील अर्ध्याहून अधिक रस्ते आणि रेल्वे क्षेत्राशी जोडलेली आहे.

केंद्र सरकारच्या एनएमपी योजनेवर काँग्रेस नेते राहुल गांधींनी नाराजी व्यक्त केली. या योजनेच्या माध्यमातून मोदी सरकार देशाची सरकारी संसाधनं विकत असल्याचा आरोप त्यांनी केला. नरेंद्र मोदी हे ३ – ४ उद्योगपतींना हाताशी धरून भारताच्या गावांवर हल्ला करत आहेत. काँग्रेसचा खासगीकरणाला विरोध नाही. पण सरकारच्या खासगीकरणाच्या पद्धतीला विरोध आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

त्यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेसनेही मोदींच्या या धोरणांवर टीका केली आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ‘मोदी सरकार देशाची संपत्ती नाही तर, युवकांची स्वप्ने विकत आहे’ असे ते म्हणालेत.

मक्तेदारीने रोजगार मिळणे बंद होईल
केंद्र सरकारने ४०० रेल्वे स्टेशन, १५० ट्रेन, वीज वितरणाचं जाळं, पेट्रोलियमचं जाळं, सरकारी गोदामं, २५ विमानतळं आणि १६० कोळसा खाणी सरकारने विकल्या. आमचा खासगीकरणाला विरोध नाही. आमच्या सरकारने तोट्यात असणाऱ्या कंपन्याचं खासगीकरण केलं. पण रेल्वे सारख्या महत्त्वाच्या विभागाचे केले नाही. आता खासगीकरण हे मक्तेदारीसाठी केलं जात आहे. या मक्तेदारीने रोजगार मिळणं बंद होईल, असं राहुल गांधी म्हणाले होते.

स्मृती इराणींचा राहुल गांधींवर पलटवार
केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारने २००८ मध्ये नवी दिल्ली रेल्वे स्थानकासंदर्भात आरएफपी जारी केली होती. २००६ मध्ये विमानतळाचं खासगीकरण सुरू करण्यात आलं होत. मग आपल्या आईच्याच नेतृत्वाखालील सरकारने रेल्वे, रस्ता आणि विमानतळ विकलं असा राहुल गांधी यांचा आरोप आहे का? असा सवाल देखील स्मृती इराणी यांनी उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!