🕒 1 min read
नवी-दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या साहसी बलिदानाने असंख्य लोकांमध्ये देशभक्तीची ठिणगी पेटली आणि ते प्रत्येक भारतीयांच्या हृदयात जगत आहेत, असे देखील मोदी म्हणाले आहेत.
आजादी के महान सेनानी शहीद भगत सिंह को उनकी जन्म-जयंती पर विनम्र श्रद्धांजलि।
The brave Bhagat Singh lives in the heart of every Indian. His courageous sacrifice ignited the spark of patriotism among countless people. I bow to him on his Jayanti and recall his noble ideals. pic.twitter.com/oN1tWvCg5u
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2021
पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की,’शूर भगतसिंग प्रत्येक भारतीयाच्या हृदयात राहतो. त्यांच्या साहसी बलिदानाने असंख्य लोकांमध्ये देशभक्तीची ठिणगी पेटली. त्यांच्या जयंतीला मी त्यांना नमन करतो आणि त्यांच्या उदात्त आदर्शांची आठवण करतो’ असे म्हणत त्यांनी क्रांतिकारी स्वातंत्र्य सेनानी भगतसिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दरम्यान, मोदींनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये दिग्गज गायिका लता मंगेशकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘आदरणीय लता दीदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांचा मधुर आवाज जगभर गाजत आहे. भारतीय संस्कृतीप्रती त्यांच्या विनम्रतेबद्दल आणि उत्कटतेसाठी त्यांचा आदर केला जातो. वैयक्तिकरित्या, त्यांचे आशीर्वाद हे महान शक्तीचे स्रोत आहेत. मी लता दीदींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो.’
Birthday greetings to respected Lata Didi. Her melodious voice reverberates across the world. She is respected for her humility & passion towards Indian culture. Personally, her blessings are a source of great strength. I pray for Lata Didi’s long & healthy life. @mangeshkarlata
— Narendra Modi (@narendramodi) September 28, 2021
महत्त्वाच्या बातम्या
- ‘जीएसटी’ प्रणालीतील त्रूटी दूर करुन ती सोपी करण्यासाठी अजितदादांच्याअध्यक्षतेखाली केंद्रस्तरीय मंत्रीगट स्थापन
- बैलगाडी, ट्रॅक्टर, दुचाकीसह अतिवृष्टीग्रस्त भागात राणाजगजितसिंह यांचा पायी दौरा
- ‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिए’; किरीट सोमय्यांचा कोल्हापूर प्रवेशाचा मार्ग मोकळा
- ‘कॉंग्रेसची सध्याची परिस्थिती पाहता मला पक्षाचे कोणतेही भविष्य दिसत नाही’
- दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्र झुकत नाही हे पवारसाहेबांनी दाखवून दिले होते – जयंत पाटील
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
