Share

सतर्क रहा : राज्यात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता – हवामान विभाग

Published On: 

मुंबई : जुलै महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला होता. अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण यासह विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी व सामान्य नागरिकांचे देखील मोठे नुकसान झाले होते. दर, आता अर्धा पावसाळा उलटल्यानंतरही मराठवाड्यातल्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पावसाची देखील प्रतीक्षा आहे.

काही ठिकाणी अतिपाऊस तर काही ठिकाणी दुष्काळ अशी विषम स्थिती निर्माण झाली असून दोन्ही भागातील शेतकऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. दरम्यान, ऑगस्टच्या सुरुवातीपासूनच पावसाचा जोर हा कमी झाला होता. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसाने पुन्हा जोर धरला असून आता १९ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसल्याण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात पुढील 2-3 दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे. तसेच राज्यात सर्वत्र पावसाची हजेरी लागणार आहे.

दरम्यान, आज आणि उद्या मुंबई हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्या म्हणजेच १८ ऑगस्ट रोजी राज्यातील पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. विदर्भ आणि नाशिकची उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर आणि उस्मानाबादमध्ये आज यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, १९ ऑगस्टनंतर पावसाचा जोर उतरेल असं देखील हवामान विभागाने म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!