नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर झालेल्या हिंसाचारावरून सुप्रीम कोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याप्रकरणी ममता बॅनर्जी चांगलेच सुनावत उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाकडून देण्यात आले आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर होत असलेल्या पलायनासंदर्भात एक जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी झाली.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुका जाहीर होण्याआधीपासून राजकीय वातावरण तापलं होतं. त्यानंतर निवडणुका जाहीर झाल्या आणि तृणमूल काँग्रेस आणि भाजपा नेत्यांमध्ये शाब्दीक जुगलबंदी रंगली. त्यानंतर लागलेल्या निवडणूक निकालात तृणमूल काँग्रेसला भरघोस यश मिळालं. मात्र त्यानंतर बंगालमध्ये अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. त्यामुळे नागरिक राज्य सोडून जात असल्याची टीका भाजपाकडून करण्यात आली.
यासाठी सर्वोच्च न्यायालयात नागरिकांचे पलायन रोखण्यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत तपासासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्यासोबत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकार आणि पश्चिम बंगाल सरकारकडे उत्तर मागितलं आहे.
याचिकेत काय म्हटले आहे?
पश्चिम बंगालमधील हिंसाचारानंतर अनेकांनी सामूहिक पलायन केले. तर अनेकांनी स्थलांतर केले. पोलीस आणि राज्य प्रायोजित गुंड यांची मिलिभगत आहे. त्यामुळे पोलिसांकडून योग्य तपास केला जात नाही. सुरक्षा पुरवण्यात पोलीस अपयशी ठरत असल्यामुळे अनेकांच्या जीवाला धोका असून, आतापर्यंत एक लाखांहून अधिक नागरिकांनी स्थलांतर केल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे.
ममता सरकारची कानउघाडणी
पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराचं प्रकरण उच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे आहे. त्यावर सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारची कानउघाडणी करत काउंटर दाखल करण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला आहे. त्यावर बंगाल सरकारच्या वकिलांनी उत्तर देत कोलकाता उच्च न्यायालयात मंगळवारी सुनावणी झाली नसल्याचं सांगितलं आहे. कारण पाच मुख्य न्यायाधीशांचं खंडपीठ नव्हतं. आता या प्रकरणी उद्या सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टातील याचिकेवर पुढची सुनावणी आता ७ जूनला होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘इम्तियाज जलील हे दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करत आहेत’, शिवसेनेचा आरोप
- ‘तेव्हा ‘दीदी ओ दीदी’ केले, आता लोक ‘दादा गप्प बस दादा’ म्हणणार आहेत!’
- ‘राज्यपाल धनखड निवृत्त झाले तर तुरुंगात पाठवू’, बॅनर्जींच्या वक्तव्याने बंगालचे राजकारण पेटले
- भीक मागून कमावलेले पावणे दोन लाख चोरीला, मुंडेंच्या परळीतील घटना
- ‘कितीही कारवाई करा, १ जूननंतर आम्ही दुकानं उघडणारच’, खा.जलील यांचा ठाकरे सरकारला इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

