पुणे : जॉनी बेअरस्टोचा शतकी अन् जेसन रॉयच्या महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाहुण्या इंग्लंडने भारताचा 6 गडी व 39 चेंडू राखून धुव्वा उडवला. कुलदीप यादव व कृणाल पांडय़ा या फिरकी गोलंदाजांचे अपयश हिंदुस्थानच्या पराभवाला कारणीभूत ठरले. या विजयामुळे इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 124 धावांची खेळी साकारणाऱया जॉनी बेअरस्टोची ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. आता तिसरा व अखेरचा सामना रविवारी पुण्यातच रंगणार आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात पुण्यात दुसरा एकदिवसीय सामना पार पडला. या सामन्यात बेन स्टोक्स नावाचं वादळ पाहायला मिळालं. या वादळात टीम इंडिया उद्धवस्त झाली. प्रथम बॅटिंग करताना टीम इंडियाने 336 धावांचा डोंगर रचला होता. परंतु स्टोक्सच्या वादळापुढे भारताच्या 336धावाही फिक्या पडल्या. स्टोक्सने 52 चेंडूत 99 धावांची बहारदार खेळी केली. या खेळीत त्याने गगनचुंबी 10 षटकार खेचले. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शतकासाठी एका धावेची गरज असताना तो भुवीच्या बोलिंगवर विकेटकीपर रिषभ पंतच्याहाती कॅच देऊन आऊट झाला.
अवघ्या एका धावेने शतक हुकल्यानंतर बेन स्टोक्स भावूक झाला होता. त्याने आकाशाकडे पाहत आपल्या दिवंगत पित्याला सॉरी म्हटलं. पाठीमागच्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालंय. अवघ्या एका धावेने शतक हुकल्यानंतर बेन स्टोक्स भावूक झाला होता. त्याने आकाशाकडे पाहत आपल्या दिवंगत पित्याला सॉरी म्हटलं. अनेक दिवसांपासून ते आजारी होते. पाठीमागच्या वर्षी त्याच्या वडिलांचं निधन झालंय.
महत्त्वाच्या बातम्या
- जालन्यात शनिवारी सायंकाळपर्यंत तरी लॉकडाऊन नाही : जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे
- पत्रकार परिषदेमध्ये जो पेन ड्राईव्ह दाखवला तो संवादाचा की गाण्याचा, मिटकरींचा सवाल
- भांडूपच्या ड्रिम मॉलमधील सनराईस रुग्णालयच्या आगीत दहा जणांचा मृत्यू
- ‘आव्हाड आणि मलिकांनीच तो अहवाल तयार करून कुंटेंना सही करायला लावली’
- ‘नवनीत राणांनी तेव्हा आवाज उठवला असता तर दीपाली चव्हाणचा जीव वाचला असता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

