Share

Sanjay Raut | बेळगाव न्यायालयाकडून संजय राऊतांना नवीन तारीख, ‘या’ तारखेला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई : सीमावादवरुन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलेल्या विधानावरुन बेळगाव कोर्टाने त्यांना समन्स बजावला होता. यामध्ये त्यांना कोर्टात हजर राहण्याचा आदेश देण्यात आला होता. मात्र, संबंधित तारखेला त्यांचे वकील गेले असून संजय राऊत हजर राहिले नव्हते. अशातच बेळगाव कोर्टाने (Belgaum Court) संजय राऊत यांना पुन्हा नवीन तारीख दिली आहे.

1 डिसेंबरला संजय राऊत यांना बेळगाव कोर्टात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. यावर काल बोलताना राऊतांनी आपण या सुनावणीला हजर राहणार नसल्याचं म्हटलं. वकिलाला पाठवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानुसार आज राऊतांचे वकील न्यायालयात गेले होते. त्यांना आता पुढची तारीख देण्यात आली आहे. 30 मार्च 2018 ला बेळगावमध्ये सीमाप्रश्नी केलेल्या भाषणात संजय राऊत यांनी प्रक्षोभक विधाने केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

दरम्यान, बेळगाव-महाराष्ट्र सीमावादावरुन राजकीय वातावरण तापलंय.कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील 40 गावांवर दावा सांगितलाय. त्यामुळे वाातवरण तापलेलं असतानाच राऊतांना बेळगाव न्यायालयाचं समन्स आलं होतं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!