Share

Sanjay Gaikwad | “चंद्रकांत खैरे पिसाळला आहे” ; संजय गायकवाड यांचा जोरदार पलटवार

Published On: 

Sanjay Gaikwad | बुलढाणा : शिंदे गटाचे आमदार अस्वस्थ आहेत. हे आमदार कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता आहे. शिंदे गटातील आमदार फुटू नयेत पुन्हा एकदा गुवाहाटीमध्ये प्रत्येकी 5 कोटी रुपये देण्यात आले आहेत”, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. त्यामुळे राजकीय चर्चेला उधान आले आहे. यावर शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गाकवाड यांनी जोरदार पलटवार केला आहे.

संजय गायकवाड म्हणाले, “ये बुढ्ढा सठीया गया है…त्याला काहीही स्वप्न पडतात. याने ऐवढे घेतले त्याने तेवढे घेतले. याचा आणि शेतकऱ्यांचा काय सबंध आहे. आम्ही जाहीरपणे सांगतो की आम्ही आमचा मुख्यमंत्री केला. आमचा मुख्यमंत्री केला. त्यामुळे पैशांशी आमता सबंध नाही आहे. जर आम्ही इतर पक्षाचा मुख्यमंत्री केला असता तर हे आरोप मान्य केले असते. पण आम्ही काम करणारा मुख्यमंत्री केला. चंद्रकांत खैरे पिसाळला आहे. पिसाळल्यासारखे ते स्टेटमेंट करत आहेत. त्यामुळे आम्ही फार काही लक्ष देत नाही.”

एकनाथ शिंदे बेईमान नाहीत-

खासदार संजय राऊत यांनी आज एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केले होते. यावर बुलढाणा शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले एकनाथ शिंदे हे काही बेईमान नाहीत, शिवाजी महाराजांनी देखील वेळप्रसंगी गनिमी कावा केलेला आहे. असाच गनिमी कावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

“ज्यांनी शिवाजी महाराज किंवा महापुरुषांबद्दल वक्तव्य केलेली आहेत. त्यांना शिंदे आणि फडणवीस यांनी योग्य तो समज दिलेला आहे. पुढे असे वक्तव्य येतील असं वाटत नाही,” अशी प्रतिक्रिया आमदार संजय गायकवाड यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!