Share

Uddhav Thackeray | “शिवप्रेमींचा उद्रेक झाला तर, महाराष्ट्रात…”, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निर्णय

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राज्यात पहिली महिला मुख्यमंत्री बसवण्याचे संकेत दिले आहेत. त्यांच्या त्या मतावर शिवसैनिकांनीही त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केलं आहे. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कोल्हापूर येथील संजय पाटील (Sanjay Patil) यांनी प्रतिक्रिया देत असताना इशारा देखील दिला आहे.

पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे जे निर्णय घेतात ते शिवसेनेसह राज्याच्या हिताचेच निर्णय घेतात, त्यामुळे महिला मुख्यमंत्री करण्याचा निर्णय त्यांनी जो घेतला आहे तो नक्कीच स्वागतार्ह असल्याचं संजय पाटील म्हणाले.

तसेच, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीगाठी नंतर भीमशक्ती-शिवशक्ती एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहेत. याबाबत बोलताना राज्याच्या आणि पक्षाच्या हितासाठी जर कोणी हात पुढे करत असेल तर त्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे योग्य तोच निर्णय घेतील, असं पाटील यांनी स्पष्ट सांगितलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाकडून वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानजनक वक्तव्य केली जात आहेत. याबाबत बोलताना संजय पाटील यांनी गंभीर इशारा दिला आहे. यावेळी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी भाजपकडून ठरवून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणे हाच त्यांचा अजेंडा असल्याचं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!