🕒 1 min read
मुंबई : भारतीय संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. आगामी सप्टेंबर महिन्यापर्यंत भारतीय संघ इंग्लंडमध्येच असणार आहे. इंग्लंड दौऱ्याचा भाग नसलेल्या भारतीय खेळाडुंचा दुसरा संघ जुलै महिन्यात श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व हे शिखर धवन करणार आहे.
या दौऱ्यावर सीएसकेचा मराठमोळा ऋतुराज गायकवाडला भारतीय संघात संधी मिळाली आहे. ऋतुराजसह सीएसकेचा नेट गोलंदाज रवीश्रीनिवास साई किशोर याची देखील नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना श्रीनिवासनने प्रतिक्रिया देताना सीएसकेच्या संघाचा सदस्य होणे ही त्याच्यासाठी सकारात्मक बाब होती. यावेळी तो म्हणाला, ‘आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीत चेन्नई सुपर किंग्सच्या संघासोबत राहणे माझ्यासाठी सर्वात सकारात्मक बाब राहिली आहे. या संघात सर्वोत्तम खेळाडुसोबत सराव केल्याने माझ्या खेळात सुधार झाला.’
Periya #WhistlePodu to our Lions picked for India's tour of Sri Lanka! ????#SLvIND #WhistlePodu #Yellove ???????? pic.twitter.com/Ynbd8XQkbK
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) June 10, 2021
मागील दोन वर्षापासुन श्रीनिवासन हा चेन्नई सुपर किंग्स संघाचा नेट गोलंदाज आहे. स्थानिक क्रिकेटमध्ये तो तामीळनाडूकडुन खेळतो. श्रीनिवासनने ए लीस्ट क्रिकेटमध्ये 25 सामन्यात 4.57च्या सरासरीने 45 गडी बाद केले आहे. तसेच 30 टी-20 सामन्यात 5.28च्या सरासरीने 33 गडी बाद केले आहे. 2018-19 सत्रात तामिळनाडुकडून तो सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज होता. त्या सत्रात त्याने 6 सामन्यात 22 गडी बाद केले होते.
महत्वाच्या बातम्या
- फ्रेंच ओपन अंतिम फेरीत प्रवेश करताच ग्रीसच्या त्सित्सिपासने घडवला इतिहास
- संभाजीराजे आज कोपर्डीत, दौऱ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष
- फ्रेंच ओपन: जोकोविचा अंतिम फेरीत प्रवेश, नदालचा पराभव करत परतफेड
- नव्या इंनिगंसाठी ‘राणादा’ सज्ज; न्यु लुक्सची सर्वत्र चर्चा
- सहा षटकार मारल्यानंतर अशी होती धोनीची प्रतिक्रिया ; युवराज सिंगने सांगितला किस्सा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
