टीम महाराष्ट्र देशा : राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्वत्र विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अवघ्या काही दिवसांवर विधानसभा निवडणूक येऊन ठेपली आहे. यामुळे राजकीय दौरे, मोर्चेबांधणी, गाठीभेटी अशा घडामोडींना वेग येऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर अनेक नेते एकमेकांवर टीका करत आहेत.
मतभेदानंतर वंचित आघाडीतून बाहेर पडलेले लक्ष्मण माने यांनी भाजपवर टीका केली आहे. त्यांनी ‘आमचा लढा हा भाजप विरोधात असून, आमचा अजेंडा भाजप भगाओ आहे. भाजपच्या मागे आरएसएस असून ही अतिरेक्यांची संघटना आहे असा आरोप केला आहे. तसेच त्यांनी या निवडणुकीत शिवसेनेसोबत आघाडी करण्यास उत्सुक असल्याचंही विधान केले आहे.
याविषयी बोलताना त्यांनी प्रबोधनकारांच्या पोराने चूक केली, मात्र नातवंडं सुधारत असतील तर मातोश्रीवर दिसायला वावडं वाटणार नाही. आमचा लढा हा भाजप विरोधात असून आम्ही एक वेळ शिवसेनेसोबत बोलणी करु. भाजप आणि शिवसेना वेगवेगळे पक्ष आहेत असं विधान माने यांनी केले आहे. त्यामुळे लक्षमण माने हे शिवसेनेसोबत इच्छुक असून भाजपला मात्र त्यांचा विरोध आहे.
दरम्यान पुढे बोलताना त्यांनी ‘दिवसेंदिवस देशाची आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे. रुपयाचे मूल्य घसरत आहे. त्यामुळे देशातील उद्योगात कमालीची घट होत आहे. तरीदेखील देशा सुव्यवस्थेत चालतो आहे, अशा अविर्भावात भाजपा सरकारमधील नेते वावरत आहेत. वेळीच हे सरकार खाली खेचले नाही तर देशाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही. येणाऱ्या विधानसभेत लोकांनी लोकशाही वाचविण्यासाठी प्रयत्न करावेत असंही विधान माने यांनी केले आहे.
- तर शिवसेनेचा ‘मनसे’ होईल : संजय काकडे
- कॉंग्रेसला प.महाराष्ट्रात मोठा धक्का,माजी आमदाराने घेतला भगवा खांद्यावर
- ‘सरकारची अवस्था दारुड्याप्रमाणे झाली, त्यामुळे गडकिल्ले विकायला काढलेत’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

