Share

ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी राहुल द्रविडचा खास गुरु मंत्र, अजिंक्य रहाणेने सांगितलं गुपित

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : “आयपीएलच्या 13 व्या  मोसमानंतर आम्ही दुबईहून थेट ऑस्ट्रेलियाच्या दिशेने निघत होतो. तेव्हा राहुल द्रविडने  मला कॉल केला होता. ताण घेण्याची गरज नाही, पहिल्या कसोटीनंतर तुलाच टीम इंडियाचे नेतृत्व करायचं आहे. तु फार चांगली फलंदाजी करतोय. फक्त फार वेळ नेट्स मध्ये सराव करु नकोस. जी चूक मी केली, त्या चुकीची पुनरावृत्ती तु करु नकोस. बाकी कोणत्याही गोष्टीचा दबाव घेऊ नको. चांगल्या प्रकारे टीम इंडियाचे नेतृत्व कर.

खेळाडूंना विश्वासात घे. मालिकेच्या निकालाबाबत फार विचार करु नकोस. निकाल आपोआप येईल”, असा सल्ला टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडने दिला असल्याचं अजिंक्य रहाणेने सांगितलं. रहाणे समालोचक हर्षा भोगलेच्या एका विशेष कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळेस रहाणे बोलत होता.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला.

नवख्या खेळाडूंना सोबत घेत रहाणेने भारताला कसोटी मालिकेत विजय मिळवून दिला. यामुळे कर्णधार रहाणेला क्रिकेटविश्वातून कौतुक करण्यात आलं. विराटऐवजी रहाणेलाच कर्णधार करा, अशी मागणी करण्यात आली. रहाणेचं भारतात परतल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आलं.

दरम्यान, कोरोनानंतर पहिल्यांदाच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यात येणार आहे. इंग्लंडविरोधातील पहिल्या 2 कसोटींसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही सामन्यांचे आयोजन चेन्नईमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यात ४ कसोटी, ५ टी२० आणि ३ वनडे सामने खेळणार आहे. टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड  यांच्यात 5 फेब्रुवारीपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!